बेळगावात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:48+5:302021-09-02T04:53:48+5:30

एकंदर मतदारराजापर्यंत पोहोचून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून करीत आहेत. बुधवारचा दिवस असल्यामुळे घरोघरी ...

Propaganda through social media in Belgaum | बेळगावात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार

बेळगावात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार

googlenewsNext

एकंदर मतदारराजापर्यंत पोहोचून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून करीत आहेत.

बुधवारचा दिवस असल्यामुळे घरोघरी जाऊन उमेदवाराचा अजेंडा आणि पत्रके वाटण्याचे काम सुरू होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मतदारांना आवाहन पत्रकांचे वाटप जोरदार करण्यात आले. याच बरोबरीने घरगुती भेटी घेऊन निवडणुकीत जिंकून आल्यानंतर नेमके काय करणार, हे सांगण्याचा प्रयत्न अनेक उमेदवारांनी केला. राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचाराचे स्वरूप मात्र वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे. मतदारांची मागणी गुप्तपणे पूर्ण करण्यावर राष्ट्रीय पक्षातील काही उमेदवारांनी भर दिला असून, या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारी झाल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी लसीकरण झाल्याशिवाय मतदानाला येणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी गुप्तपणे लसीकरण मोहीम आयोजित करून अडून बसलेल्या मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी बोअरवेल खणून देण्याचे प्रकार घडत असून, काही भागांत गुप्तपणे रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात काम सुरू झाले तरच मतदान करणार, अशी आग्रही भूमिका काही मतदारांनी घेतल्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी आपल्या शक्तीचा वापर करून त्या प्रकारची कामे सुरू केली असून, त्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रारी होत आहेत. मात्र या संदर्भात कोणती कारवाई झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रचाराचे स्वरूप बदलत चालले आहे. पूर्वी सभा आणि बैठका घेऊन उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत होता. मात्र यावेळी कोणत्याही ठिकाणी जाहीर सभा आणि बैठका झाल्या नाहीत. उमेदवारांनी घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष भेटून आवाहन करण्यावरच सुरुवातीपासून भर दिला आहे.

Web Title: Propaganda through social media in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.