मालमत्ता कराची आकारणी भाडेमूल्यानुसार करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:47+5:302021-02-06T04:42:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : मालमत्ता कराची पूर्वीप्रमाणेच भाडेमूल्यानुसार आकारणी करावी, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्षा अलका स्वामी यांना नगरसेवक ...

Property tax should be levied according to the rental value | मालमत्ता कराची आकारणी भाडेमूल्यानुसार करावी

मालमत्ता कराची आकारणी भाडेमूल्यानुसार करावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : मालमत्ता कराची पूर्वीप्रमाणेच भाडेमूल्यानुसार आकारणी करावी, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्षा अलका स्वामी यांना नगरसेवक शशांक बावचकर यांनी दिले.

निवेदनात, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून मालमत्ता कराची फेरआकारणी करण्याचे पत्र शासनाकडून नगरपरिषदेस प्राप्त झाले आहे. देशात कोरोनामुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यातच केंद्र सरकारने स्वत:ची जबाबदारी झटकत राज्य व स्थानिक संस्थांवर टाकत आहे. स्थानिक संस्था आकारत असलेल्या मालमत्ता करामध्ये भाडेमूल्य कर आकारणीऐवजी भांडवली मूल्य कर आकारणीची अंमलबजावणी करावी, असे केंद्र सरकारचे धोरण दिसत आहे.

दरम्यान, भांडवली मूल्य कर आकारणी पद्धतीमुळे सध्या असलेल्या भाडेमूल्य आकारणीपेक्षा जवळपास तीनपट मालमत्ता दराची आकारणी केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये राहत्या घराचा अथवा व्यवसायातील जागेचा रेडिरेकनर दर व त्यावरील बांधकामाचा दर हे एकत्रित करून आकारणी केल्याने मालमत्ताधारकांना ती न परवडणारी आहे, असे म्हटले आहे.

Web Title: Property tax should be levied according to the rental value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.