६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:41+5:302021-05-11T04:25:41+5:30
इचलकरंजी : येथील योगायोगनगरमधील स्क्रॅपच्या गोडाऊनचे शटर उचकटून तांबे, पितळ व घनमेटल, असा एकूण एक लाख ९७ हजार रुपयांचा ...
इचलकरंजी : येथील योगायोगनगरमधील स्क्रॅपच्या गोडाऊनचे शटर उचकटून तांबे, पितळ व घनमेटल, असा एकूण एक लाख ९७ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोटारसायकल व हेक्सा ब्लेड, असा एकूण ६९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि.९) रात्री उशिरा करण्यात आली.
साहिल अकबर सय्यद (वय २५), संजय विश्वनाथ केसरवानी (२१, दोघे रा.चंदूर, ता. हातकणंगले ) व कृष्णात प्रकाश पोतेकर (२३, रा.योगायोगनगर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, राजेश श्यामलाल गौड यांचे योगायोगनगरमध्ये स्क्रॅपचे गोडाऊन आहे. तिघा संशयितांनी गोडाऊनचे शटर उचकटून तांबे, पितळ व घनमेटल, असा एकूण एक लाख ९७ हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर, पोलीस अंमलदार रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, महेश पाटील, सुकुमार बरगाले, प्रकाश कांबळे यांनी केली.