पेठ-सांगली सहापदरीकरणाच्या प्रस्तावास गती

By admin | Published: August 16, 2016 10:52 PM2016-08-16T22:52:09+5:302016-08-16T23:32:17+5:30

भूसंपादनावर भवितव्य : दोन तालुक्यांच्या प्रगतीला मिळेल बळ; शहरांमधील वाहतुकीचा भार कमी करण्यास उपयोग

Proposal of Peth-Sangli Sixth gradation | पेठ-सांगली सहापदरीकरणाच्या प्रस्तावास गती

पेठ-सांगली सहापदरीकरणाच्या प्रस्तावास गती

Next

सांगली : वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या पेठ-सांगली रस्त्याच्या सहापदरीकरणाचा नवा प्रस्ताव आता चर्चेत आला आहे. पेठपासून थेट म्हैसाळपर्यंतच्या सहापदरी रस्त्याचे काम प्रस्तावित असल्याने वाळवा, मिरज तालुक्याच्या प्रगतीच्यादृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. रस्त्याची लांबी मोठी असल्याने याठिकाणच्या भूसंपादनावर कामाचे भवितव्य अवलंबून आहे. सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाचा २५0 कोटींचा प्रस्ताव यापूर्वी पाठविण्यात आला होता. चौपदरीकरणाच्या कामात दोन्ही बाजूस ९ मीटरचा रस्ता प्रस्तावित होता. या रस्त्याचे काम काहीअंशी पूर्ण झाले असले तरी वाढत्या वाहनांचा विचार करता, चौपदरीकरणाचा फारसा उपयोग होणार नाही, असाही सूर उमटत आहे. शंकांच्या याच गर्दीतून सहापदरीकरणाचा नवा प्रस्ताव तयार झाला. आ. सुधीर गाडगीळ यांनी पेठ-सांगली-मिरज-म्हैसाळ असा मोठा मार्ग सहापदरी करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गडकरी यांनीही याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितल्याने या प्रस्तावाला आता गती आली आहे. तांत्रिक गोष्टींसह लवकरच हा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
सहापदरीकरण करतानाच कृष्णा नदीवर दोन स्वतंत्र पुलांचा उल्लेखही करण्यात आला आहे. यापूर्वी चौपदरीकरणाला भूसंपादनाचा कोणताही अडथळा आला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेतच चौपदरीकरणाचा आराखडा पूर्ण झाला होता. त्यामुळे मंजुरीच्या पातळीवर प्रस्तावाला गती मिळाली होती. सहापदरीकरण करताना या मार्गावर मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन करताना नुकसानभरपाईचा नवा कायदाही लागू होईल. त्यामुळे सहापदरीचा खर्च कित्येक पटीने वाढणार आहे. शासनाने खर्चाच्या मोठ्या शक्यतेलाही अनुकूलता दर्शविली, तर सहापदरीकरणाचे स्वप्न सत्यात उतरू शकते. पेठ-सांगलीपर्यंतच्या शेतजमिनीबरोबरच सांगली, मिरजेतील गावठाणातील, विस्तारित भागातील रहिवासी जमिनीही ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे या सर्व अडचणींवर मात करावी लागणार आहे. तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्यामते सहापदीरकरणाचे काम मंजूर झाले, तर हा रस्ता दोन्ही तालुक्यांसह जिल्ह्याच्याच प्रगतीसाठी लाभदायी ठरणार आहे. कृष्णा नदीवरील प्रस्तावित दोन पुलांमुळे आणि शहरातील सहापदरी रस्त्याच्या अस्तित्वामुळे वाहतुकीचा मोठा भार कमी होणार आहे. अपघातांचे प्रमाण यामुळे कमी होण्याची शक्यताही आहे. (प्रतिनिधी)


रस्ता मोठा : भूसंपादनही अधिक
पेठ ते सांगली हा रस्ता सुमारे ४0 किलोमीटर अंतराचा आहे. सांगली ते म्हैसाळ हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. सहापदरीकरणाअंतर्गत एकूण ६२ किलोमीटरचे काम करावे लागेल. सहापदरीकरणाअंतर्गत दोन्ही बाजूस १५ मीटर अंतराचा अंतर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणजेच रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा मीटर अंतरातील जमिनी संपादित कराव्या लागतील. शासकीय नोंदीनुसार सांगली-पेठ रस्त्यावर प्रतिदिन ७५ ते ८0 हजार टन वाहतुकीचा भार आहे. वाढती वाहने, त्यांचा भार याबाबतचा विचार केल्यास सहापदरीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


रस्ता मोठा : भूसंपादनही अधिक
पेठ ते सांगली हा रस्ता सुमारे ४0 किलोमीटर अंतराचा आहे. सांगली ते म्हैसाळ हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. सहापदरीकरणाअंतर्गत एकूण ६२ किलोमीटरचे काम करावे लागेल. सहापदरीकरणाअंतर्गत दोन्ही बाजूस १५ मीटर अंतराचा अंतर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणजेच रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा मीटर अंतरातील जमिनी संपादित कराव्या लागतील. शासकीय नोंदीनुसार सांगली-पेठ रस्त्यावर प्रतिदिन ७५ ते ८0 हजार टन वाहतुकीचा भार आहे. वाढती वाहने, त्यांचा भार याबाबतचा विचार केल्यास सहापदरीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पेठ-सांगली-मिरज-म्हैसाळ या ६२ किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण करावे
सीआरएफ (सेंट्रल रोड फंड) मधून काम मंजूर करावे
कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला दोन पर्यायी पूल याच कामातून मंजूर व्हावेत
एक पूल कोल्हापूर रस्ता ओलांडून हरिपुरजवळून नदीवर उभारावा व सांगलीवाडी, समडोळीपासून पुढे प्रस्तावित करावा
दुसरा पूल पांजरपोळमार्गे कृष्णा नदीवर व्हावा

Web Title: Proposal of Peth-Sangli Sixth gradation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.