कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गात शेतजमीन जाणाऱ्यांना चारपट मोबदल्याचा प्रस्ताव द्या, मंत्री चंद्रकांत पाटलांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 01:03 PM2023-03-08T13:03:48+5:302023-03-08T13:04:24+5:30

एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या

Propose quadruple compensation to those going to agricultural land on Kolhapur-Ratnagiri highway, suggests Minister Chandrakant Patil | कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गात शेतजमीन जाणाऱ्यांना चारपट मोबदल्याचा प्रस्ताव द्या, मंत्री चंद्रकांत पाटलांची सूचना

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गात शेतजमीन जाणाऱ्यांना चारपट मोबदल्याचा प्रस्ताव द्या, मंत्री चंद्रकांत पाटलांची सूचना

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी कोल्हापूर प्राधिकरणातील ४२ पैकी शिये, भुये, निगवे दुमाला, भुयेवाडी, टोप, नागाव व जठारवाडी या ७ गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जाणार असून येथील शेतकऱ्यांनी संपादनाप्रमाणे चारपट मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे. त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग व भूसंपादन विभागाने वाढीव मोबदला मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करावा अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी केली.

शासकीय विश्रामगृह येथे मंत्री पाटील यांची प्राधिकरणातील शिये, भुये, निगवे दुमाला, भुयेवाडी, टोप, नागाव व जठारवाडी या गावातील शेतकऱ्यांनी भेट घेतली. यावेळी आमदार पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, भूसंपादन अधिकारी शक्ती कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, प्रशासनाने कोल्हापूर प्राधिकरणातील सात गावांमधील ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी राष्ट्रीय महामार्गात जाणार आहेत, त्यांना इतर ग्रामीण भागात ज्याप्रमाणे मोबदला मिळतो त्याप्रमाणे मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करावा व तो शासनाला सादर करावा. भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळण्यापासून प्राधिकरणातील या सात गावांमधील एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. जिल्हाधिकारी राहुल रेखावार सदर प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल असे सांगितले.

Web Title: Propose quadruple compensation to those going to agricultural land on Kolhapur-Ratnagiri highway, suggests Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.