शालिनी सिनेटोन, जयाप्रभा स्टुडिओचे संरक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:58+5:302021-06-24T04:17:58+5:30
कोल्हापूर : शालिनी सिनेटोन आणि जयाप्रभा स्टुडिओ या वास्तूंचे संरक्षण हेरिटेज म्हणून करावे, अशा मागणीचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार ...
कोल्हापूर : शालिनी सिनेटोन आणि जयाप्रभा स्टुडिओ या वास्तूंचे संरक्षण हेरिटेज म्हणून करावे, अशा मागणीचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, शहरात संस्थानकाळात शालिनी सिनेटोन, जयप्रभा स्टुडिओ या ठिकाणी चित्रपटांची निर्मिती होत होती. यामुळे बहुतांश जुन्या मराठी चित्रपटांची निर्मिती कोल्हापुरात झाली. राजर्षी शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराजांनी स्टुडिओची जागा दिली होती. सध्या सिनेटोन आणि जयाप्रभा स्टुडिओची जागा विकासाच्या नावाखाली बिल्डरला देण्याचा घाट आहे. जयाप्रभा स्टुडिओमधील शेतजमीन विकली आहे. स्टुडिओची जागा आहे. हेरिटेज असल्यामुळे तिला धक्का लावता आलेला नाही. पण शालिनी सिनेटोनच्या जागेचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकासक या जागेवर हौसिंग प्रकल्प उभा करणार आहेत. यामध्ये महापालिका प्रशासकांनी लक्ष घालावे.
निवेदन देताना बाबूराव कदम, माजी प्राचार्य टी. एस. पाटील, दिलीपकुमार जाधव, संभाजी जगदाळे, संग्राम माने, प्रकाश शिंदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.