कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना अखेर संरक्षण, राजपत्रात नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:51+5:302021-03-23T04:26:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य वन्यजीव मंडळाच्या संवर्धन राखीव वनक्षेत्राच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आता कोल्हापूर वनविभागाच्या ...

Protection of seven forest areas in Kolhapur, Satara and Sindhudurg finally registered in the Gazette | कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना अखेर संरक्षण, राजपत्रात नोंद

कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना अखेर संरक्षण, राजपत्रात नोंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य वन्यजीव मंडळाच्या संवर्धन राखीव वनक्षेत्राच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आता कोल्हापूर वनविभागाच्या कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना 'संवर्धन राखीव वनक्षेत्रा'चा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा मिळाला असून १५ मार्च रोजीच्या राजपत्रात याची नोंद झाली आहे.

यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत वन्यजीवांचा प्रामुख्याने वाघांचा कॉरिडॉर कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण ८६ हजार ५५४ हेक्टरच्या वनक्षेत्राला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण मिळाले आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीत या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या या प्रस्तावाला ही मंजुरी मिळाली होती. कोल्हापूरमधील ९,३२४ हेक्टरमधील विशाळगड ७,२९१ हेक्टरमधील पन्हाळा, १०,५४८ हेक्टरमधील गगनबावडा, २४,६६३ हेक्टरमधील आजरा-भुदरगड २२,५२३ हेक्टरमधील चंदगड, सातारा जिल्ह्यातील ६,५११ हेक्टरमधील जोर-जांभळी तसेच ८६६ हेक्टरमधील मायणी पक्षी अभयारण्याला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ५६९२ हेक्टरमधील आंबोली-दोडामार्ग येथील वनक्षेत्रांसह सह्याद्रीच्या वनक्षेत्रामधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला या 'वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२'अंतर्गत संरक्षण मिळाले आहे.

(संदीप आडनाईक)

Web Title: Protection of seven forest areas in Kolhapur, Satara and Sindhudurg finally registered in the Gazette

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.