‘गोकुळ’तर्फे ‘रक्षा ट्रायोव्हॅक’ लसीकरण
By admin | Published: May 29, 2014 01:14 AM2014-05-29T01:14:48+5:302014-05-29T01:28:55+5:30
दिलीप पाटील यांची माहिती : पाच लाख जनावरांना लसीकरणाचे उद्दिष्ट
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने घटसर्प, फर्या व लाळखुरकत या आजारावर एकच ‘रक्षा ट्रायोव्हॅक’ लसीकरण केले जाते. यावर्षी जिल्ह्यातील पाच लाख जनावरांना हे लसीकरण करणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. पावसाळ्यात घटसर्प, फर्या, लाळखुरकत हे संसर्गजन्य आजार जनावरांना होतात. या आजाराची लागण झाल्यानंतर उपचार करूनही जनावरे १०० टक्के बरी होत नाहीत. त्यासाठी लागण होण्यापूर्वी हे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. ‘गोकुळ’ व शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरणाचा संयुक्त कार्यक्रम हाती घेतला आहे. या लसीकरणाचे वेळापत्रक सर्व दूध संस्थांना आठ दिवस अगोदर कळविले जाणार आहे. जनावरांना हे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आहे.