इचलकरंजीत पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:37+5:302021-09-02T04:50:37+5:30

इचलकरंजी : ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पिंगळे गंभीररीत्या जखमी ...

Protest against the attack on Ichalkaranjit Pimple | इचलकरंजीत पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

इचलकरंजीत पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

Next

इचलकरंजी : ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पिंगळे गंभीररीत्या जखमी झाल्या. इचलकरंजी नगर परिषद सर्व कामगार संघटना कृती समितीच्यावतीने मंगळवारी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन निषेध केला.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहायक आयुक्त पिंपळे यांच्यावर भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या हाताची तीन बोटे तुटली असून, ही खूप गंभीर बाब आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करत कृती समितीने प्रशासनाने हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. निदर्शनामध्ये उपमुख्याधिकारी केतन गुजर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, ए.बी.पाटील, अण्णासाहेब कागले, के.के.कांबळे, आदींसह नगर परिषद कामगार संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.

फोटो ओळी

३१०८२०२१-आयसीएच-०१

ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला. या निषेधार्थ इचलकरंजी नगर परिषद सर्व कामगार संघटना कृती समितीने पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निषेध व्यक्त केला.

Web Title: Protest against the attack on Ichalkaranjit Pimple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.