मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

By समीर देशपांडे | Published: April 12, 2023 01:13 PM2023-04-12T13:13:54+5:302023-04-12T13:14:54+5:30

अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काही संबंध नव्हता असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ केले आंदोलन

Protest by Thackeray group in Kolhapur against Minister Chandrakant Patil, demanding his resignation | मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

googlenewsNext

कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापुरात आज, बुधवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध केला. 

अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काही संबंध नव्हता अशा पद्धतीचे वक्तव्य पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्याच्या निषेधार्थ आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

राजकारणाच्या बाबतीत कुठेही नाक खूपसून प्रसार माध्यमातून आपण वेगळे आहोत हे दाखवून देण्याचा पाटील यांचा जुना धंदा आहे अशा शब्दात जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पाटील यांचा समाचार घेतला आहे. यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी. रवी इंगवले यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मुलाखतीत केले होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. "मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते", असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

अमित शाहांच्या भेटीनंतर आशिष शेलारांचे खडे बोल

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर भाजपमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पाटील यांना हे वक्तव्य टाळता आले असते, असे खुद्द भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तसेच, पाटील यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्‍तिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यावर शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Web Title: Protest by Thackeray group in Kolhapur against Minister Chandrakant Patil, demanding his resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.