आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी संघटनेचं ठिय्या आंदोलन; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
By विश्वास पाटील | Published: November 7, 2022 11:03 AM2022-11-07T11:03:50+5:302022-11-07T11:12:45+5:30
कोल्हापूरहून पुण्याकडे येत असताना सातारा येथील आनेवाडी टोल नाक्यावरील हे आंदोलन सुरू झाले आहे.
कोल्हापूर : आनेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संघटनेचे आज सोमवारी पुण्यात साखर संकुलास घेराव आंदोलन आहे. त्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या गाड्या सोडण्यास नाक्यावर दिल्यावर कार्यकर्त्यांनी टोल नाके बंद पाडले.
कोल्हापूरहून पुण्याकडे येत असताना सातारा येथील आनेवाडी टोल नाक्यावरील हे आंदोलन सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यास टोल माफी मग शेतकऱ्यांना का नाही?, अशी विचारणा संतप्त शेतकरी करत आहेत. नाक्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
कोल्हापूर : आनेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संघटनेचे आज सोमवारी पुण्यात साखर संकुलास घेराव आंदोलन आहे. ( व्हिडिओ- विश्वास पाटील) pic.twitter.com/s5DtOVJPFN
— Lokmat (@lokmat) November 7, 2022