शाहूवाडी पंचायतसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:13+5:302021-03-10T04:26:13+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील श्री निनाईदेवी मंदिरासमोर बाधण्यात आलेले मागासवर्गीय सभागृह ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेची परवाणगी ...
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील श्री निनाईदेवी मंदिरासमोर बाधण्यात आलेले मागासवर्गीय सभागृह ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेची परवाणगी न घेता पाडले आहे . तरी सावे ग्रामपंचायत बरखास्त करावी , सरपंच , ग्रामसेवक यांची चौकशी होऊन कारवाई करावी या मागणीसाठी शाहूवाडी पंचायतीसमोर बहुजन रयत परिषद, डोमो क्रॉटी पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व रमेश चांदणे, भीमराव साठे यांनी केले. न्याय न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .
सावे गावात २०११ साली श्री निनाईदेवी मंदिरासमोर आमदार फंडातून मागासवर्गीय समाजासाठी सामजिक सभागृह बांधण्यात आले होते. मागासवर्गीय समाजाचे सभागृह मंदिरासमोर नको आहे . या जातीवादी व मनुवादी विचारसरणीतून रातोरात कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायतीने सदर सभागृह जमीन दोस्त केले आहे. तरी याबाबतची तक्रार गटविकास अधिकारी अनिल वाघमारे याच्याकडे दिली होती त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. देवस्थान समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक याची चौकशी करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा ' अन्यथा जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देणार असल्याचे भीमराव साठे यांनी सांगितले. आंदोलनात रमेश चांदणे, भीमराव साठे, संजय धोंगडे, अमित गायकवाड, सुशांत कांबळे, महेश सोने, अभिजित गोसावी, शंकर वडर आदींसह बहुजन रयत परिषद, डी. पी. आयचे कार्यकर्त उपस्थित होते.
फोटो -
शाहूवाडी पंचायतीसमोर आपल्या मागण्यांसाठी बहुजन रयत परिषद व डी.पी.आय संघटनेच्या वतीने निदर्शने करताना रमेश चांदणे, भीमराव साठे, संजय धोंगडे आदी.