जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाडमध्ये निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:21+5:302021-09-02T04:50:21+5:30

अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर, संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खचते. त्यामुळे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, ...

Protests in Jaysingpur, Shirol, Kurundwad | जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाडमध्ये निषेध

जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाडमध्ये निषेध

Next

अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर, संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खचते. त्यामुळे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करून पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. या वेळी तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.

दरम्यान, कुरुंदवाड पालिका कर्मचाऱ्यांच्या हस्ते मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्राची पाटील, नंदकुमार चौधरी, अजित दिपंकर, विनायक दळवी, निशिकांत ढाले, रोहित ढाले, सतीश कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. शिरोळ येथे संदीप चुडमुंगे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. तर जयसिंगपूर येथे पवन म्हेत्रे, संदीप कांबळे, प्रफुल्लकुमार व्हनखंडे, प्रशांत तराळ, पंकज तराळ, गणेश भेंडवडे, दुर्याेधन भंडारे, सचिन कुरणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

फोटो - ३१०८२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - शिरोळ पालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Protests in Jaysingpur, Shirol, Kurundwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.