शिरोळ तहसीलसमोर ओबीसी जनमोर्चाकडून निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 AM2021-06-25T04:18:48+5:302021-06-25T04:18:48+5:30
प्रास्ताविक दीपक कांबळे यांनी करून आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. ओबीसी सोशल फौंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब बागडी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ...
प्रास्ताविक दीपक कांबळे यांनी करून आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. ओबीसी सोशल फौंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब बागडी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कारवाई करावी, मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, अशी मागणी केली. ओबीसींच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी काळात मोठे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला. यावेळी राज्य व केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सुरेश सासणे, महेश परीट, संजय सुतार, इब्राहीम मोमीन, संजय गुरव, बबन बन्ने, दिलीप परीट, संजय परीट, प्रकाश तगारे, बबन भुई, तुळशीदास माने, तानाजी गंगधर, दत्तात्रय यादव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
फोटो - २४०६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ तहसीलसमोर नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांना ओबीसी जनमोर्चाच्यावतीने निवेदन देण्यात आले.