गडहिंग्लजला महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:56+5:302021-07-16T04:16:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : केंद्र सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात ...

Protests by revenue staff at Gadhinglaj | गडहिंग्लजला महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

गडहिंग्लजला महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : केंद्र सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी छातीवर काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जीएसटी संकलनातील महाराष्ट्र राज्याच्या वाट्याचे ४० हजार कोटी तत्काळ राज्याकडे वळते करावेत, कामगार व कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारे कायदे मागे घ्यावेत, राज्यातील लाखो रिक्त पदे तातडीने भरावीत, सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी आणि अनुज्ञेय आर्थिक मदत तत्काळ द्यावी, आदी प्रलंबित मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील, लखन खाडे, अमित पाटील, मनिषा निकम, सुरेश बारामती, प्राजक्ता पाटील, रमेश कवठणकर, आदी सहभागी झाले होते.

फोटो ओळी : गडहिंग्लज तहसील कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेतर्फे केलेल्या निदर्शनात अशोक पाटील, लखन खाडे, अमित पाटील, मनिषा निकम, सुरेश बारामती, प्राजक्ता पाटील, रमेश कवठणकर आदी सहभागी झाले होते.

क्रमांक : १५०७२०२१-गड-०४

Web Title: Protests by revenue staff at Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.