प्रॉव्हिडंड फंडातील २५ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना द्या : पंतप्रधानांना पाठविले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:07 AM2020-04-16T11:07:16+5:302020-04-16T11:08:34+5:30
केंद्र सरकार या सर्व कर्मचाºयांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधीसाठी रक्कम कपात करून घेते. परंतु सध्याचा काळ कसोटीचा आहे. त्यांच्यापुढे जगायचे कसे, हा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सूचना करून या कामगारांना भविष्य निर्वाह निधीतील किमान २५ टक्के रक्कम उपलब्ध करून दिल्यास त्यांना थोडा दिलासा मिळू शकेल.
कोल्हापूर : सरकारी व खासगी आस्थापनामध्ये काम करणाºया कर्मचाºयांच्या खात्यावर केंद्र सरकारने त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील (प्रॉव्हिडंड फंड) किमान २५ टक्के रक्कम तातडीने जमा करावी, अशी मागणी शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधानांकडे मंगळवारी पत्राद्वारे केली आहे.
सध्या कोरोनामुळे खासगी उद्योग बंद आहेत. कोरोनाचा फटका म्हणून कामगार कपातीची भीती व्यक्त होत आहे. कारखाने सुरू व्हायलाही काही महिने लागण्याची शक्यता आहे. अशा काळात या कारखान्यांत काम करणा-या कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत. मिळालेला पगार संपत आला आहे. कुटुंबाची गुजराण करताना त्यांची चांगलीच कसरत होत आहे.
केंद्र सरकार या सर्व कर्मचाºयांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधीसाठी रक्कम कपात करून घेते. परंतु सध्याचा काळ कसोटीचा आहे. त्यांच्यापुढे जगायचे कसे, हा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सूचना करून या कामगारांना भविष्य निर्वाह निधीतील किमान २५ टक्के रक्कम उपलब्ध करून दिल्यास त्यांना थोडा दिलासा मिळू शकेल. तरी तातडीने यासंबंधीचे आदेश आपण द्यावेत, असे खासदार राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रासह देशातील कोट्यवधी कामगारांना या निर्णयाचा लाभ होऊ शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
भविष्य निर्वाह निधीकडे सर्व कर्मचा-यांचे अद्ययावत बँकिंग रेकॉर्ड असते. त्यामुळे हे पैसे देण्यात फारशी अडचण येणार नाही. हा निधी भविष्यासाठी आहे, हे खरेच, परंतु माणूस जगला तरच भविष्याचा विचार करता येईल. तो जगण्यासाठी त्याला आता मदत देण्याची गरज आहे.
खासदार विनायक राऊत
गटनेते, शिवसेना पक्ष लोकसभा