केखले आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:14+5:302021-01-25T04:26:14+5:30
वारणानगर : ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यातर्फे केखले (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अत्याधुनिक ...
वारणानगर : ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यातर्फे केखले (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा असणारी रुग्णवाहिका रविवारी प्रदान करण्यात आली. शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून केखले प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका प्रदान केली.
केखले प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध नव्हती. या परिसरातील रुग्णांना कोडोली अथवा अन्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागत होता. आमदार विनय कोरे व माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांच्या विशेष प्रयत्नांतून केखले केंद्रास ही रुग्णवाहिका मिळाली.
यावेळी पन्हाळा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कवठेकर, केखले केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. पाटील, कोडोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील अभिवंत, शिवाजीराव जंगम, के. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. बी. टी. साळोखे, रणजित शिंदे-सरकार, ॲड. राजेंद्र पाटील, बहिरेवाडीचे सरपंच शिरीषकुमार जाधव, मारुती पाटील, दिलीप पाटील, सतीश पाटील, अनिल महापुरे, अरुण महापुरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
२४ केखले ॲम्बुलन्स
वारणानगर येथे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते रविवारी केखले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कवठेकर, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. सुनील अभिवंत, प्रा. बी. टी. साळोखे, शिवाजीराव जंगम, के. आर. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.