दुय्यम निबंधक कार्यालयासाठी कोर्टाची इमारत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:46+5:302021-03-13T04:43:46+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लजमधील दुय्यम निबंधक कार्यालय सध्या दहा बाय दहाच्या खोलीत सुरू आहे. दररोज ५० ते ६० दस्त नोंदणी ...

Provide a court building for the secondary registrar's office | दुय्यम निबंधक कार्यालयासाठी कोर्टाची इमारत द्या

दुय्यम निबंधक कार्यालयासाठी कोर्टाची इमारत द्या

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लजमधील दुय्यम निबंधक कार्यालय सध्या दहा बाय दहाच्या खोलीत सुरू आहे. दररोज ५० ते ६० दस्त नोंदणी आणि चारशे-पाचशे लोकांची वर्दळ त्यामुळे कार्यालयाला जागा अपुरी पडत आहे. त्यासाठी जुन्या तालुका कोर्ट इमारतीची वापराविना असलेली जागा दुय्यम निबंधक कार्यालयासाठी द्यावी, अशी मागणी गडहिंग्लजच्या नागरिकांनी केली आहे.

अपुरी जागा आणि सर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज शहर आणि तालुक्यातील ८९ गावांतील जमीन, घरे, फ्लॅट, प्लॉट आदी खरेदी-विक्रीचे व्यवहार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात होतात. व्यवहार पूर्ण करण्यासाठी कार्यालयात नेहमी वर्दळ असते. परंतु, सर्व्हर डाऊनमुळे व्यवहारांसाठी ताटकळत थांबावे लागते. काहीवेळा दोन-तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे इतर कामे सोडून दस्त नोंदणीसाठी खूप वेळ द्यावा लागतो.

कार्यालयासाठी महसूल भवनलगतच्या पोलीस परेड मैदानावरील जागा मंजूर आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे ते काम रखडले आहे. सद्य:स्थितीतील कार्यालयाची जागा विस्थापित होणे गरजेचे आहे. त्यासाठी तालुका कोर्टाची इमारत कार्यालयाला देण्यात यावी तसेच कार्यालयाकडील कामाचा विस्तार पाहता मंजूर जागेतदेखील दोन स्वतंत्र कार्यालये उभी करावीत.

निवेदनावर, आशपाक मकानदार, सुभाष कोरे, पांडुरंग पाटील, महावीर दसूरकर, महेश आरभावी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

----------------------------------

* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना आशपाक मकानदार व पांडुरंग पाटील यांनी निवेदन दिले. यावेळी सुभाष कोरे, महावीर दसूरकर आदी उपस्थित होते.

क्रमांक : ११०३२०२१-गड-०६

Web Title: Provide a court building for the secondary registrar's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.