टेंबलाईवाडीत होणार आयटी पार्क, कायदेशीर बाबी पूर्ण करा; पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 04:08 PM2022-05-28T16:08:12+5:302022-05-28T16:18:35+5:30

टेंबलाईवाडी येथील जागा आयटी पार्कसाठी विकसित करण्यात येणार असून, या संदर्भामधील कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.

Provide early space for IT Park, Suggestion of Guardian Minister Satej Patil | टेंबलाईवाडीत होणार आयटी पार्क, कायदेशीर बाबी पूर्ण करा; पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना

टेंबलाईवाडीत होणार आयटी पार्क, कायदेशीर बाबी पूर्ण करा; पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना

googlenewsNext

कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील जागा आयटी पार्कसाठी विकसित करण्यात येणार असून, या संदर्भामधील कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. २४ जूनला पुढील बैठक घेऊन, नियोजित आराखड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

कोल्हापुरातील प्रस्तावित आयटी पार्कसंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका अधिकारी आणि कोल्हापूर आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. नियोजित आयटी पार्कमध्ये चांगल्या कंपन्या कशा येतील यासाठी चर्चा करण्यात आली. आयटी पार्कच्या उभारणीमुळे कोल्हापुरात रोजगारनिर्मिती चांगल्या प्रकारे होणार असून, स्थानिक युवक-युवतींना याचा लाभ होणार आहे. त्याअनुषंगाने ज्या कंपन्या कोल्हापूरमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देण्यावरही बैठकीत चर्चा झाली.

आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करून त्याप्रमाणे निविदाप्रक्रिया करणे या अनुषंगिक तांत्रिक, आर्थिक व कायदेशीर प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. कोल्हापुरातील तरुणांना रोजगाराच्या शोधात परजिल्ह्यात आणि परराज्यात जावे लागते. मात्र कोल्हापुरात, आयटी क्षेत्रातील तरुणांना नोकऱ्या निर्माण झाल्यास त्यातून शहराचाच विकास होईल हे विचारात घेऊन नियोजन करण्यात येत असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

यावेळी ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, कोल्हापूर आयटी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, प्रसन्न कुलकर्णी, प्रताप पाटील, विश्वजित देसाई, स्नेहल बियाणी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Provide early space for IT Park, Suggestion of Guardian Minister Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.