राजाराम तलाव परिसराचा विकास करण्यासाठी निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:44+5:302021-07-17T04:20:44+5:30
उचगाव: प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सरनोबतवाडी येथील राजाराम तलाव परिसराचा विकास करण्यासाठी २ कोटी २५ लाखांच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, ...
उचगाव: प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सरनोबतवाडी येथील राजाराम तलाव परिसराचा विकास करण्यासाठी २ कोटी २५ लाखांच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी विनंती आमदार ऋतुराज पाटील यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना केली. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून कार्यवाही करण्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. शिवाजी विद्यापीठ समोरील निसर्गरम्य परिसरामध्ये राजाराम तलाव असून शहर व उपनगरातील अनेक नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येत असतात. कोल्हापूर शहरामध्ये व नजीक रंकाळा, कळंबा व राजाराम तलाव येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे राजाराम तलाव परिसराचा विकास व्हावा यादृष्टीने प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.
या प्रस्तावाला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून केली. उपलब्ध असलेले जलसाठे जतन करणे ही काळाची गरज असून पर्यटनदृष्ट्या तलावांचे महत्त्व वाढवण्यासाठी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिले.
फोटो : राजाराम तलाव विकास प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.