जिल्हा, तालुका कृषिसेवा केंद्रांना अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:40+5:302021-06-04T04:18:40+5:30
कोल्हापूर : खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या प्रत्येक गोणीमागे जवळपास ७०० ते ९०० रुपयांची वाढ केली होती. शेतकऱ्यांनी मोठ्या ...
कोल्हापूर : खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या प्रत्येक गोणीमागे जवळपास ७०० ते ९०० रुपयांची वाढ केली होती. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केल्यानंतर केंद्र शासनाने डीएपी खतावर अनुदान देण्याची घोषणा केली. हे अनुदान कच्चामाल तयार करणाऱ्या कंपन्यांपुरते मिळाले; परंतु जिल्हा कृषी केंद्रे, तालुका कृषी केंद्रे व कृषिसेवा केंद्रे यांना ही अनुदान रक्कम अद्याप मिळाली नाही, ती तातडीने द्यावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार हे या वेळी उपस्थित होते. त्यांनीही या वेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस चांगला असून, शेतातील कामे जोर धरू लागली आहेत. युरियाची कमतरता भासू नये, याकरिता बफर स्टाॅक न करता शेतकऱ्यांच्या बांधावर युरिया उपलब्ध करून द्यावा, केंद्र व राज्य शासनाने सध्या फक्त १८:१८:१० या एकाच ग्रेडला परवानगी दिली आहे. तेव्हा उर्वरित तीन ग्रेडनाही लवकरात लवकर परवानगी मिळावी, अशा मागण्या निवेदनातून पाटील यांनी केल्या. त्याला भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
०३०६२०२१ कोल राजेश पाटील निवेदन
जिल्हा, तालुका कृषिसेवा केंद्रांना खताचे अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार उपस्थित होते.