इनव्हॅलिड मिळकतींची माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:18+5:302021-02-06T04:45:18+5:30

कोल्हापूर : शहरातील ज्या सहा हजार मिळकती इनव्हॅलिड करून त्यांचा घरफाळा शू्न्य करण्यात आला आहे, अशा सर्व मिळकतधारकांची ...

Provide information on invalid income | इनव्हॅलिड मिळकतींची माहिती द्या

इनव्हॅलिड मिळकतींची माहिती द्या

googlenewsNext

कोल्हापूर : शहरातील ज्या सहा हजार मिळकती इनव्हॅलिड करून त्यांचा घरफाळा शू्न्य करण्यात आला आहे, अशा सर्व मिळकतधारकांची यादी देण्यात यावी, तसेच २०१९ मध्ये महापुरात सापडलेल्या परंतु सवलतींचा लाभ मिळालेला नाही, अशा नळकनेक्शनधारकांना पाणी बिलात सवलत द्यावी, अशी मागणी महानगरपालिकेतील भाजप - ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे केली.

सत्यजित कदम, सुनील कदम, विजय सूर्ववंशी, राजसिंह शेळके, आशिष ढवळे यांनी शुक्रवारी सायंकाळी अतिरिक्त आयुक्त देसाई यांची भेट घेतली. ज्या सहा हजार मिळकती इनव्हॅलिड करून त्यांचा घरफाळा शून्य करण्यात आला आहे, त्या सर्वांची यादी द्यावी, प्रकारास कोण जबाबदार आहे, त्याची माहिती द्यावी, सुधारित देयके कधी देणार आहेत, सुधारित देयकाप्रमाणे नुकसानीस कोण जबाबदार आहेत, २५४ कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी बड्या थकबाकीदारांची माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शहरातील अडीच हजार मिळकतधारकांना महापुरावेळी पाणी बिलात सवलत देण्यात आली होती, परंतु कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, मुक्त सैनिक, शाहूपुरी, नागाळापार्क, रमणमळा परिसरातील नागरिकांना या सवलतींचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अशा सर्व पूरग्रस्त मिळकतधारकांना महासभेने घरफाळा व पाणी बिलात दिलेल्या सवलतींचा लाभ मार्च २०१२१ पूर्वी देण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Provide information on invalid income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.