धनगरवाड्यातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:58+5:302021-06-24T04:16:58+5:30
जिल्ह्यातील धनगरवाडा वस्तीवरील लोकांना वैद्यकीय सुविधा द्या अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा यशवंत सेनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना ...
जिल्ह्यातील धनगरवाडा वस्तीवरील लोकांना वैद्यकीय सुविधा द्या अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा यशवंत सेनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड, गगनबावडा तालुक्यात दुर्गम ठिकाणी धनगरवाडे आहेत. त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी रस्ते सुद्धा नाहीत. हे धनगरवाडे वैद्यकीय सुविधांपासून वंचित आहेत. येथील लोकांना वैद्यकीय सुविधांसाठी डोलीत बसून मैलोन्मैल चालत पायपीट करावी लागते. त्यामुळे धनवाडामधील लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या नाहीत तर यशवंत सेना आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी यशवंत सेनेचे अध्यक्ष राजेश तांबवे, जिल्हा सचिव योगेश हराळे, जिल्हा उपाध्यक्ष अमर पुजारी, ओंकार माने, सागर पुजारी, डॉ. शिवराज पुजारी,संदीप वळकुंजे, भीमराव वळकुंजे, तम्मा शिरोले, मैनाप्पा गावडे, गणपती सिद, चंद्रकांत वाळकुंजे, बाबासो लांडगे उपस्थित होते.
फोटो : २३ यशवंत सेना निवेदन
ओळी धनगरवाडा वस्तीवरील लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याबाबतचे निवेदन यशवंत सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देताना राजेश तांबवे, योगेश हराळे, तम्मा शिरोले, अमर पुजारी आदी.