प्राथमिक शाळांना अत्याधुनिक भौतिक सेवासुविधा उपलब्ध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:42+5:302021-08-26T04:25:42+5:30
लोकमत न्यूज अलीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. जि.प. शाळांची गुणवत्ता व दर्जा वाखाणण्याजोगा ...
लोकमत न्यूज
अलीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. जि.प. शाळांची गुणवत्ता व दर्जा वाखाणण्याजोगा आहे. यामागे सर्वच शिक्षकांचे कष्ट व जिद्द प्रशंसनीय आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जि.प. शाळांच्या यशाचा अटकेपार झेंडा लागत आहे. यासाठी त्यांना भौतिक सुविधा पुरविण्यात येतील, असे प्रतिपादन नूतन सभापती सौ. सोनाली पाटील यांनी केले.
पंडेवाडी, ता. राधानगरी येथील केंद्र शाळा सोळांकूरअंतर्गत शाळांना जिल्हा परिषद स्वनिधीतून मिळालेले क्रीडा साहित्य, विज्ञान साहित्य व गणवेश वितरण कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष प्रकाश चौगुले होते.
यावेळी जि.प. सदस्या सविता शिवाजीराव चौगुले, सरपंच रसिदा मुलानी, उपसरपंच शिवाजीराव चौगले, शिवाजी पाटील, शि.गो. पाटील, केंद्रप्रमुख नामदेवराव रेपे, केंद्र मुख्याध्यापिका राजश्री बरगे,
शाळा समिती सदस्य सुभाषराव चौगुले, दिलीप नाईकवडे, प्रकाश पाटील, शांताराम चौगुले, रसूल मुलानी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थितीत होते. स्वागत केंद्रप्रमुख नामदेवराव रेपे यांनी, तर सूत्रसंचालन पंडित पाटील, डी.जी.पाटील यांनी केले. आनंदा सावर्डेकर यांनी आभार मानले.