उच्च माध्यमिक आश्रमशाळांना विषयानुरूप शिक्षक पदे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:22+5:302021-08-15T04:25:22+5:30

काेल्हापूर : राज्यातील उच्च माध्यमिक आश्रमशाळांना विषयानुरूप शिक्षक पदे मिळावीत, यासह विविध मागण्यांचे निवेदन आश्रमशाळा संस्थाचालक संघाच्या वतीने शिक्षक ...

Provide subject wise teacher posts to higher secondary ashram schools | उच्च माध्यमिक आश्रमशाळांना विषयानुरूप शिक्षक पदे द्या

उच्च माध्यमिक आश्रमशाळांना विषयानुरूप शिक्षक पदे द्या

Next

काेल्हापूर : राज्यातील उच्च माध्यमिक आश्रमशाळांना विषयानुरूप शिक्षक पदे मिळावीत, यासह विविध मागण्यांचे निवेदन आश्रमशाळा संस्थाचालक संघाच्या वतीने शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांना देण्यात आले. २०२०-२१ वर्षातील परिपोषण अनुदान, इमारत भाडे अनुदान व ८ टक्के, १२ टक्के वेतनेतर अनुदान त्वरित वितरित करावे, प्राथमिक विभागाच्या आश्रमशाळांना ८ टक्के वेतनेतर अनुदान सर्व निवासी, अनिवासी मान्य शिक्षकांवर मंजूर व्हावे, आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेच्या धर्तीवर विमुक्त जाती, भटक्या जमाती आश्रमशाळांना आकृतिबंध लागू करावेत, अशा मागण्या संघाच्या वतीने आमदार प्रा. आसगावकर यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील भोसले, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सावगावे, संजीव नाईक, माणिकलाल राठोड, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : राज्यातील आश्रमशाळांच्या मागणीचे निवेदन आश्रमशाळा संस्थाचालक संघाच्या वतीने आमदार प्रा. जयंत आसगावकर यांना देण्यात आले. यावेळी सुनील भोसले, बाबासाहेब सावगावे, आदी उपस्थित होते. (फोटो-१४०८२०२१-कोल-आश्रमशाळा)

Web Title: Provide subject wise teacher posts to higher secondary ashram schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.