महिला पोलिसांसाठी टॉयलेट व्हॅन प्रदान

By admin | Published: June 1, 2017 01:18 AM2017-06-01T01:18:18+5:302017-06-01T01:18:18+5:30

‘रोटरी सनराईज’चा उपक्रम : सतेज पाटील यांच्याकडून निधी

Provide toilet van for women police | महिला पोलिसांसाठी टॉयलेट व्हॅन प्रदान

महिला पोलिसांसाठी टॉयलेट व्हॅन प्रदान

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सनराईजतर्फे जिल्ह्यातील महिला पोलिसांसाठी अत्याधुनिक दर्जाचे सर्वसोयींनीयुक्त मोबाईल टॉयलेट व्हॅन प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व शहरांत अशा सर्व सोयी-सुविधा असलेली अत्याधुनिक मोबाईल व्हॅन भविष्यात उपलब्ध होणे गरजेचे आहे. ‘रोटरी सनराईज’ने केलेल्या या उपक्रमाबद्दल कोल्हापूरचे नाव अग्रेसर राहील, असेही गौरवोद्गार विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी काढले. आमदार सतेज पाटील यांनी १० लाख रुपये निधी देण्याचे यावेळी जाहीर केले.
अलंकार हॉल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट ३२७० चे गव्हर्नर रोटेरियन विनय पै-रायकर होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, आमदार सतेज पाटील यांनीही भाषणात ‘रोटरी’च्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक सचिन झंवर यांनी केले. यावेळी रोटरी सनराईजचे असिस्टंट गर्व्हनर शरद पाटील, शिशिर शिंदे, सचिव पी. एम. कालेकर, चंदन मिरजकर, हृषिकेश केसरकर, विक्रांतसिंह कदम, अ‍ॅड. इंद्रजित चव्हाण, गौरव शहा, प्रसन्न देशिंगकर, देवेंद्र इंगळे, राजीव पारिख, रवी संघवी, राहुल कुलकर्णी, ‘रोटरी’चे सर्व सदस्य उपस्थित होते.
 

Web Title: Provide toilet van for women police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.