डवरवाडी शाळेस रश्मीज ट्रस्टकडून शालेय उपयोगी साहित्य प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:47+5:302021-08-14T04:29:47+5:30

यावेळी रश्मीज ट्रस्टचे सेक्रेटरी डॉ. भावना कुचेरिया व डॉ. सुहास कुचेरिया, मेडिकल इन्चार्ज यांच्या हस्ते संगणक, प्रिंटर, स्पीकर ...

Provide useful school materials from Rashmij Trust to Davarwadi School | डवरवाडी शाळेस रश्मीज ट्रस्टकडून शालेय उपयोगी साहित्य प्रदान

डवरवाडी शाळेस रश्मीज ट्रस्टकडून शालेय उपयोगी साहित्य प्रदान

Next

यावेळी रश्मीज ट्रस्टचे सेक्रेटरी डॉ. भावना कुचेरिया व डॉ. सुहास कुचेरिया, मेडिकल इन्चार्ज यांच्या हस्ते संगणक, प्रिंटर, स्पीकर यासह अन्य शालेय वस्तू डवरवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आल्या. डवरवाडी ही दुर्गम भागातील उपक्रमशील शाळा असून पुढे जाण्याची उर्मी मिळावी. नवीन तंत्रज्ञान मुलांना मिळावे याच हेतूने सर्व साहित्य दिले असल्याचे मत डॉ. भावना कुचेरिया यांनी व्यक्त केले.

यावेळी रश्मीज ट्रस्ट मुंबईचे लाईफ मेंबर भरत शहा, धर्मशी पटेल, भावना शहा, हीना पटेल, दीपा ठक्कर, राष्ट्रपती विजेते संभाजी पाटील, शाळा समिती उपाध्यक्ष दत्तात्रय डवर, संभाजी डवर यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक किरण पाटील यांनी स्वागत केले.

संभाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. अमरनाथ शेंडगे यांनी आभार मानले.

Web Title: Provide useful school materials from Rashmij Trust to Davarwadi School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.