विम्याच्या बनावट पावत्या देऊन रिक्षा व्यावसायिकांची लूट--टोळीचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:55 PM2020-02-13T12:55:13+5:302020-02-13T12:56:56+5:30

कोल्हापूर : विम्याच्या बनावट पावत्या देऊन सर्वसामान्य रिक्षा व्यावसायिकांची लूट करणा-या टोळीचा शोध घ्यावा. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ...

By providing fake insurance receipts | विम्याच्या बनावट पावत्या देऊन रिक्षा व्यावसायिकांची लूट--टोळीचा शोध घ्या

विम्याच्या बनावट पावत्या देऊन सामान्य रिक्षा व्यावसायिकांची लूट करणाºया टोळीवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी कोल्हापुरात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले.

Next
ठळक मुद्दे रिक्षाचालकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करा

कोल्हापूर : विम्याच्या बनावट पावत्या देऊन सर्वसामान्य रिक्षा व्यावसायिकांची लूट करणा-या टोळीचा शोध घ्यावा. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दलाल व यामध्ये सहभागी असणाºया रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, विमा पावती असल्याखेरीज वाहनांचे पासिंग करता येत नाही, असा नियम आहे. अलीकडे काही रिक्षाचालकांनी विम्याच्या बनावट पावत्या कागदपत्रांसोबत जोडल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या बनावट पावत्या देणारी आणि कागदपत्रे तयार करणारी एक यंत्रणा सक्रिय आहे. सखोल चौकशी करून सर्वसामान्य रिक्षाचालकांची लुबाडणूक करून, बनावट पावत्या देणाºयांवर कायदेशीर कारवाई करावी. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी या प्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, दीपक गौड, किशोर घाडगे, तुकाराम साळुंखे, सुनील जाधव, रणजित जाधव, रमेश खाडे, अमित चव्हाण, रघुनाथ टिपुगडे, विशाल देवकुळे, गजानन भुर्के, दीपक चव्हाण, सुनील भोसले, अंकुश निपाणीकर, सुशील भांदिगरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 

 

Web Title: By providing fake insurance receipts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.