नेसरी विभागातील सार्वजनिक गणेश मंडळांना समई प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:27 AM2021-09-14T04:27:21+5:302021-09-14T04:27:21+5:30
येथील पोलीस स्टेशन ठाण्यात हा कार्यक्रम झाला. कोविडरूपी अंधार जाऊन सर्वांच्या जीवनात प्रकाश पडू दे, यासाठी समई दिल्याचे पाटील ...
येथील पोलीस स्टेशन ठाण्यात हा कार्यक्रम झाला. कोविडरूपी अंधार जाऊन सर्वांच्या जीवनात प्रकाश पडू दे, यासाठी समई दिल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. समाजातील कला, क्रीडा व इतर कार्यक्षेत्रातील व्यक्ती शोधून त्यांना त्या-त्या क्षेत्रात कुशल मार्गदर्शन करून त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी मंडळे व सामाजिक संस्था यांनी पुढाकार घ्यावा, त्यासाठी आपलेही सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी नेसरीसह तारेवाडी, हडलगे, सांबरे, हेबबाळ जलद्याळ, मुंगूरवाडी, कडाल, तुप्पूरवाडी, कुमरी, गावठाण, तावरेवाडी आदी गावांतील सुमारे ३० सार्वजनिक गणेश मंडळांना पाटील, एस. एन. देसाई, प्रल्हाद माने, रवींद्र हिडदुगी, विनायक पाटील, दिनकर पाटील, एम. के. देसाई, सहा. फौजदार शिवाजीराव पाटील, संजय जाधव, पांडुरंग निकम यांच्याहस्ते समई प्रदान करण्यात आल्या.
प्रल्हाद माने यांनी स्वागत केले. यावेळी शिवाजीराव पाटील यांनी गणेश मंडळांनी पाळावयाचे नियम व अटी सांगितल्या. रवींद्र हिडदुगी यांनी सूत्रसंचालन केले. विनायक पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे उद्योजक बाबूराव पाटील-हेळेवाडीकर यांनी नेसरी विभागातील सर्व गणेश मंडळांना समई भेट दिली. यावेळी मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रमांक : १३०९२०२१-गड-२३