गणवेशापोटी पाच कोटींची तरतूद

By admin | Published: June 10, 2017 12:48 AM2017-06-10T00:48:28+5:302017-06-10T00:48:28+5:30

जिल्हा परिषद : जिल्ह्यातील चित्र

A provision of five crore rupees | गणवेशापोटी पाच कोटींची तरतूद

गणवेशापोटी पाच कोटींची तरतूद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि चार नगरपरिषदांमध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील एक लाख २० हजार २०६ विद्यार्थ्यांना गणवेशापोटी चार कोटी ८० लाख ८२ हजार रुपये अदा करण्यात येणार आहेत. शाळा व्यवस्थापन समितीकडे हा निधी वर्ग करण्यात येणार असून, त्यानंतर तो विद्यार्थी, पालकांच्या संयुक्त खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जमातीची मुले, अनुसूचित जातीची मुले, तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना गणवेश उपलब्ध करून दिले जातात. आता थेट गणवेश देण्याऐवजी थेट अनुदान पद्धतीने बँक खात्यावर दोन गणवेश संचाचे ४०० रुपये जमा करण्यात येणार आहेत.


तालुकापात्र विद्यार्थीअनुदान
आजरा४४३४१७७३६००
भुदरगड६०९९२४३९६००
चंदगड८२९९३३१९६००
गडहिंग्लज७६१४३०४५६००
गगनबावडा२१७६८७०४४
हातकणंगले२०८८०८३५२०००
कागल१०६८५४२७४०००
करवीर१७५७०७०२८०००
शिरोळ१३५४५५४१८०००
पन्हाळा१०२१७४०८६८००
राधानगरी०९०८४३६३३६००
शाहूवाडी०९६०३३८४१२००
एकूण१२०२०६४८०८२४००


प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशांचे ४०० रुपये मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आईने किंवा वडिलांनी मुलासह आपले संयुक्त खाते राष्ट्रीयीकृत बँकेत काढणे आवश्यक आहे.पालकांनी लवकरच ही खाती काढावीत.
- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी.

Web Title: A provision of five crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.