‘लोकमत’च्या आरोग्याचा जागर विशेषांकाचे प्रकाशन

By admin | Published: June 11, 2015 01:06 AM2015-06-11T01:06:25+5:302015-06-11T01:06:34+5:30

मान्यवरांच्या शुभेच्छा : गडहिंग्लज विभागीय कार्यालयाचा १६वा वर्धापदिन उत्साहात साजरा

Public awareness of 'Lokmat' awareness | ‘लोकमत’च्या आरोग्याचा जागर विशेषांकाचे प्रकाशन

‘लोकमत’च्या आरोग्याचा जागर विशेषांकाचे प्रकाशन

Next

गडहिंग्लज : ‘लोकमत’च्या गडहिंग्लज विभागीय कार्यालयाच्या १६व्या वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘आरोग्याचा जागर’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकारात्मक व समाजाभिमुख पत्रकारितेबद्दल कौतुक करून ‘लोकमत’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नगरपालिकेच्या पू. साने गुरुजी वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे व उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, तहसीलदार हनुमंत पाटील, मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्याहस्ते विशेषांकाचे प्रकाशन झाले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व जाहिरात उपव्यवस्थापक श्रीराम जोशी यांची उपस्थिती होती.
नगराध्यक्षा घुगरे म्हणाल्या, गडहिंग्लजच्या राजकीय घडामोडीवर अचूक व रोखठोक भाष्य करणाऱ्या ‘लोकमत’ची भूमिका विधायक व समतोल आहे. संस्कारक्षम पिढ्या घडविण्याचे मोलाचे काम ‘लोकमत’ करत आहे.
तहसीलदार पाटील म्हणाले, स्पर्धा परीक्षांपासूनच मार्गदर्शक राहिलेल्या ‘लोकमत’चे प्रशासकीय सेवेतही मोलाचे मार्गदर्शन आहे. विधायक व रोखठोक पत्रकारितेतून मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीत ‘लोकमत’ची भूमिका मोलाची आहे.
प्राचार्य जे. बी. बार्देस्कर म्हणाले, प्रत्येक कुटुंबातील सर्वांचा आवडता असणारा ‘लोकमत’ ग्रामीण युवकांचा खरा मार्गदर्शक आहे.
डॉ. बी. एस. पाटील म्हणाले, नकारात्मक बातम्यांना दुय्यम स्थान आणि विधायक बातम्यांना पहिल्या पानावर स्थान मिळून सकारात्मक पत्रकारिता सुरू होण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घ्यावा.
सरव्यवस्थापक देशमुख म्हणाले, नेहमी प्रयोगशील राहिलेला ‘लोकमत’ गडहिंग्लज विभागाच्या सर्वांगीण विकासात विधायक भूमिका बजावत आहे.
शालेय विद्यार्थी, युवक आणि महिला यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच सकस व संग्राह्य पुरवण्या देण्यात ‘लोकमत’ आघाडीवर आहे.
याप्रसंगी महालक्ष्मी यात्रा समिती अध्यक्ष रमेश रिंगणे, गडहिंग्लज अर्बन बँकेचे संचालक व साई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने, जनसुराज्यचे तालुकाध्यक्ष सोमगोंडा आरबोळे, गडहिंग्लज शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष महादेव अडसुळे, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, नगरसेवक रामदास कुराडे व नरेंद्र भद्रापूर, बाळासाहेब गुरव, युवराज बरगे, पवन तोरगल्ली, आण्णासाहेब पाटील, ‘लोकमत’चे चंदगड प्रतिनिधी नंदकुमार ढेरे, वार्ताहर विजयकुमार कांबळे (अडकूर), रवींद्र येसादे (उत्तूर), आदी उपस्थित होते.
‘लोकमत’चे विभागीय प्रमुख राम मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वार्ताहर प्रकाश चोथे यांनी आभार मानले.

‘लोकमत’मुळेच निवडणूक बिनविरोध
गडहिंग्लज अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र आजरी, तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय बरगे यांची फेरनिवड झालेबद्दल त्यांचा ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक देशमुख व जाहिरात उपव्यवस्थापक जोशी यांच्याहस्ते सत्कार झाला. त्यावेळी ‘लोकमत’मुळेच बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे आवर्जून नमूद करून सहकार्य व सत्काराबद्दल आजरी यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

Web Title: Public awareness of 'Lokmat' awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.