यड्रावमध्ये १४ मे पर्यंत जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:58+5:302021-05-08T04:24:58+5:30
गावामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तीन रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तरीही ग्रामस्थांमध्ये याचे गांभीर्य दिसून येत ...
गावामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तीन रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तरीही ग्रामस्थांमध्ये याचे गांभीर्य दिसून येत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीने शुक्रवार (दि. १४) पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
या कालावधीत उद्योग व व्यवसाय सुरू ठेवल्यास ५०० रुपये, विना मास्क २०० रुपये, विनाकारण फिरताना आढळल्यास २०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्यास २०० रुपये, विहिरीवर अंघोळीसाठी व विनाकारण कट्ट्यावर बसणारे ५०० रुपये अशी दंड आकारणी करण्यात येणार आहे.
पार्वती औद्योगिक वसाहतीसह व परिसरामध्ये परवाना नसतानाही कारखाना चालू असल्याचे आढळल्यास पाच हजार रुपये दंड व एक महिना कारखाना बंद ठेवण्यात येणार आहे.
फोटो - ०७०५२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळी : यड्राव (ता. शिरोळ) येथे जनता कर्फ्यूच्या प्रबोधनासाठी सुरक्षा रक्षकांनी संचलन केले.