कोरोनाच्या लढाईत जनतेने काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:16+5:302021-01-02T04:20:16+5:30
जयसिंगपूर : कोरोनाशी लढतानाच महाविकासाच्या दिशेने वाटचाल करत असून २०२१ या नवीन वर्षात राज्याची प्रगती आणि विकासाची गती अधिक ...
जयसिंगपूर : कोरोनाशी लढतानाच महाविकासाच्या दिशेने वाटचाल करत असून २०२१ या नवीन वर्षात राज्याची प्रगती आणि विकासाची गती अधिक दृढ करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. नववर्षात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. २०२० मध्ये आपल्याला कोविड-१९ या जागतिक महामारीच्या विरोधात संघर्ष करावा लागला. या संघर्षात डॉक्टर्स, नर्स, आशा स्वयंसेविका, आरोग्य, पोलीस यंत्रणा, अत्यावश्यक सेवेतील सर्वच अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक या कोविड योद्ध्यांनी मोठे योगदान दिले. प्रसंगी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. या सर्वांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. राज्यात सर्वच स्तरांवर हा लढा लढविण्याचे सामर्थ्य देणाऱ्या कोविड योद्धांचे योगदान अतुलनीय आहे. २०२० चा हा संघर्षमय इतिहास ध्यानात घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. संकट अजूनही टळलेले नाही, मात्र खबरदारी हाच एकमेव उपाय असून सर्व नियमान्वये २०२१ या नवीन वर्षात मार्गाक्रमण करूया, असेही मंत्री यड्रावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
फोटो - ३११२२०२०-जेएवाय-०४-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर