‘शाहूंच्या आठवणी’ पुस्तकाच्या ५१ व्या आवृत्तीचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:14+5:302021-02-06T04:44:14+5:30

पाचगाव : प्रा. नानासाहेब साळुंखे लिखित ‘शाहूंच्या आठवणी’ या पुस्तकाच्या ५१व्या आवृत्तीचे प्रकाशन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ...

Publication of the 51st edition of the book 'Memories of Shahu' | ‘शाहूंच्या आठवणी’ पुस्तकाच्या ५१ व्या आवृत्तीचे प्रकाशन

‘शाहूंच्या आठवणी’ पुस्तकाच्या ५१ व्या आवृत्तीचे प्रकाशन

googlenewsNext

पाचगाव : प्रा. नानासाहेब साळुंखे लिखित ‘शाहूंच्या आठवणी’ या पुस्तकाच्या ५१व्या आवृत्तीचे प्रकाशन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकास संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला असून, या पुस्तकामुळे छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत जाण्यास मदत झाली आहे, असे मत मालोजीराजे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे, भारत साळुंखे, मानसिंग पाटील, रूपेश पाटील, श्रीराम साळुंखे, प्रकाश साळुंखे, डॉ. जय साळुंखे, नीलेश सुतार, विलास साळुंखे, प्रणील इंगळे, संदीप सातपुते, सागर भोसले, राजू साळुंखे, प्रतीक साळुंखे, रोहन चौगुले, उमेश भंडारी, संग्राम लिंग्रस, शीतल मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो : ०५ पाचगाव पुस्तक प्रकाशन

ओळ : कोल्हापुरात ‘शाहूंच्या आठवणी’ या पुस्तकाच्या ५१व्या आवृत्तीचे प्रकाशन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभयकुमार साळुंखे उपस्थित होते.

Web Title: Publication of the 51st edition of the book 'Memories of Shahu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.