शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागामध्ये पुस्तक प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:33 PM2020-12-17T12:33:38+5:302020-12-17T12:38:38+5:30
literature, kolhapur , hindi इंटरनेटवर सध्या वेब साहित्य, माहितीचे भांडार उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याची पिढी दिवसेंदिवस गुगलजीवी बनत आहे. इंटरनेटवरील या माहितीचे रूपांतर ज्ञानात करता आले पाहिजे. अशा स्थितीत हिंदी वेब साहित्य पुस्तकामुळे वाचकांना ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मिळाला आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी केले.
कोल्हापूर : इंटरनेटवर सध्या वेब साहित्य, माहितीचे भांडार उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याची पिढी दिवसेंदिवस गुगलजीवी बनत आहे. इंटरनेटवरील या माहितीचे रूपांतर ज्ञानात करता आले पाहिजे. अशा स्थितीत हिंदी वेब साहित्य पुस्तकामुळे वाचकांना ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मिळाला आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी केले.
विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित आणि करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी संपादित केलेल्या ह्यहिंदी वेब साहित्यह्ण पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शनिवारी ते बोलत होते.
राष्ट्रभाषा हिंदीचे महत्त्व, हिंदीच्या विकासासाठी महात्मा गांधी यांनी केलेले प्रयत्न, सध्याची हिंदीची स्थिती व सध्याच्या काळात वेब साहित्याचे वाढते महत्त्व, आदींबाबत प्रा. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणेचे कोल्हापूर विभागाचे प्रमुख डॉ. नारायण केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे, आनंदा आगम, भाग्यश्री पाटील, आदी उपस्थित होते. प्रा. संजय चोपडे, डॉ. चंदा सोनकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय सदामते यांनी आभार मानले.
पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती
विश्वास सुतार यांनी हिंदी वेब साहित्य पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती काढल्याचे समाधान आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उदय आणि विकास झाला असल्याचे डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी यावेळी सांगितले.