‘अर्थसमीक्षा’, ‘अर्थसंकीर्ण’, ‘उसनवारी’ पुस्तकांचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:24 AM2021-04-01T04:24:29+5:302021-04-01T04:24:29+5:30
अर्थविषयक प्रश्नावर विपुल लेखन करणाऱ्या डॉ. जे.एफ. पाटील यांनी कोरोनाच्या महासंकटामुळे गेल्या वर्षभरात निर्माण झालेल्या विविध आर्थिक प्रश्नांची ...
अर्थविषयक प्रश्नावर विपुल लेखन करणाऱ्या डॉ. जे.एफ. पाटील यांनी कोरोनाच्या महासंकटामुळे गेल्या वर्षभरात निर्माण झालेल्या विविध आर्थिक प्रश्नांची मांडणी आपल्या लेखणीतून केली आहे. त्यांनी लिहिलेले हे लेख विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले असून, यातील निवडक लेख या तीन पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांसाठी पुन्हा उपलब्ध झाले आहेत.
डॉ. पाटील यांनी ‘अर्थसमीक्षा’ हे आपले पुस्तक डी.वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांना अर्पण केले आहे. यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वित्ताधिकारी श्रीधर नारायण स्वामी, परीक्षा नियंत्रक अरुण पोवार, संशोधन संचालक डॉ. सी.डी. लोखंडे आदी उपस्थित होते.
फोटो : ३१ जे. एफ. पाटील पुस्तक प्रकाशन
ओळी-
प्रा. डॉ. जे.एफ. पाटील यांच्या ‘अर्थसमीक्षा’, ‘अर्थसंकीर्ण’ व ‘उसनवारी’ या पुस्तकांचे प्रकाशन करताना डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील. समवेत विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, परीक्षा नियंत्रक अरुण पोवार, कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले, वित्ताधिकारी श्रीधर नारायण स्वामी.