‘बुरुज’ आत्मचरित्राचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:27 AM2021-02-16T04:27:04+5:302021-02-16T04:27:04+5:30
कोल्हापूर : ‘गारगोटी, शेणगावात बालपण ते मुंबईतील मंत्रालयात कक्ष अधिकारी’ असा प्रवास करतच जगन्नाथ सणगर यांनी समाजासाठी मोठे कार्य ...
कोल्हापूर : ‘गारगोटी, शेणगावात बालपण ते मुंबईतील मंत्रालयात कक्ष अधिकारी’ असा प्रवास करतच जगन्नाथ सणगर यांनी समाजासाठी मोठे कार्य केले आहे. हा त्यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. जगन्नाथ सणगर यांच्या ‘बुरुज’ या आत्मचरित्राचे प्रकाशन तलवार चौकातील केदारनाथ सभागृहात आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दीपा मगदूम होत्या.
जगन्नाथ सणगर, स्मिता मोरे, प्रा. रघुनाथ ढमकले, नंदकुमार जोशी, मनोज जाधव, रितू सणगर, हणमंत कारंडे, क्षितीज सणगर, रोहन सणगर, राजू जमादार यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार राजेंद्र सणगर यांनी स्वागत, सूत्रसंचालन केले. दीपक गुंडप यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, रजनी हिरळीकर, जया सणगर, प्रकाशक जहाँगीर जमादार, आदी उपस्थित होते.
फोटो : १५०२२०२१ कोल सणगर न्यूज
ओळी : कोल्हापुरातील जगन्नाथ सणगर यांच्या ‘बुरुज’ या आत्मचरित्राचे प्रकाशन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जगन्नाथ सणगर, दीपा मगदूम, जया सणगर, शारंगधर देशमुख उपस्थित होते.