अनिल चव्हाण लिखित ‘जडण घडण’चे प्रकाशन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:24 AM2021-03-05T04:24:33+5:302021-03-05T04:24:33+5:30
कोल्हापूर : अनिल चव्हाण लिखित ‘जडण-घडण‘ या आत्मकथनाचे प्रकाशन राजर्षी शाहू स्मारक भवनात निवृत्त शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड यांच्या ...
कोल्हापूर : अनिल चव्हाण लिखित ‘जडण-घडण‘ या आत्मकथनाचे प्रकाशन राजर्षी शाहू स्मारक भवनात निवृत्त शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासाहेब लाड होते.
गायकवाड म्हणाले, चव्हाण यांच्या संघर्षमय व समाजाला आदर्शव्रत वाटचालीबाबत त्यांनी गौरवौदगार काढले. अवघ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी यशाचे अनेक टप्पे पार केले आहेत. त्यांच्या आत्मकथनाला जीवनातील केलेल्या संघर्षामुळे एक विशिष्ट उंची प्राप्त झाली आहे. दादासाहेब लाड म्हणाले, चव्हाण यांचा प्रामाणिकपणा, कष्टाळूवृत्ती, ध्येयवेडेपणा, आदीबाबत त्यांचे कौतुक केला. स्वागत व प्रास्ताविक गरुडभरारी फाउंडेशनचे संचालक रवींद्र मोरे व अमोल कांबळे यांनी आभार मानले. यावेळी ईश्वरा चव्हाण, अलका चव्हाण, जयश्री चव्हाण, विलासराव चव्हाण, कैलास सुतार, गंगाराम हजारे प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : ०४०३०२०२१-कोल-पुस्तक प्रकाशन
आेळी : अनिल चव्हाण लिखित ‘जडण-घडण‘ या आत्मकथनाचे प्रकाशन राजर्षी शाहू स्मारक भवनात संपतराव गायकवाड यांच्या हस्ते व दादासाहेब लाड, रवींद्र मोरे, विलास चव्हाण, जयश्री चव्हाण, अलका चव्हाण, ईश्वरा चव्हाण आदी उपस्थित होते.