शिवाजी विद्यापीठात निशा पवार यांच्या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:05+5:302021-09-03T04:24:05+5:30

या कार्यक्रमावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन डॉ. निशा पवार यांचा सत्कार केला. ‘मीडिया रिसर्च ...

Publication of Nisha Pawar's research book at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात निशा पवार यांच्या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात निशा पवार यांच्या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन

Next

या कार्यक्रमावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन डॉ. निशा पवार यांचा सत्कार केला. ‘मीडिया रिसर्च इन कंटेम्पररी सोसायटी’ हा ग्रंथ डॉ. पवार यांच्या निवडक माध्यमविषयक संशोधन लेखांचा संग्रह आहे. यात समकालीन माध्यम संशोधनाचा समावेश असून विशेष म्हणजे कर्नाटक विद्यापीठ, धारवाडतर्फे हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. माध्यमातील विविध विषयांचा ऊहापोह या लेखांमध्ये असून त्याचा लाभ माध्यमातील संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक यांना होईल, असा विश्वास डॉ. पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी आतापर्यंत दहापेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यामध्ये पब्लिक रिलेशन, थिअरॉटिकल डायमेन्शन ऑफ वुमन इन इंडियन प्रिंट मीडिया, वृत्तपत्रीय लेखनाची दोन दशके, संवादशास्त्र, वूमन इन रिजनल टेलिव्हजन चॅनल्स, आदींचा समावेश आहे.

फोटो (०२०९२०२१-कोल-निशा पवार बुक) : शिवाजी विद्यापीठात गुरुवारी डॉ. निशा पवार लिखित ‘मीडिया रिसर्च इन कंटेम्पररी सोसायटी’ या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. पी. एस. पाटील, विलास नांदवडेकर, आर. के. कामत आदी उपस्थित होते.

020921\02kol_6_02092021_5.jpg

फोटो (०२०९२०२१-कोल-निशा पवार बुक) : शिवाजी विद्यापीठात गुरूवारी डॉ. निशा पवार लिखित ‘मीडिया रिसर्च इन कंटेम्पररी सोसायटी’ या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन  कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. पी. एस. पाटील, विलास नांदवडेकर, आर. के. कामत, आदी उपस्थित होते.

Web Title: Publication of Nisha Pawar's research book at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.