पुणे-बेंगलोर महामार्ग कर्नाटकच्याच मालकीचा आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:23+5:302021-08-14T04:29:23+5:30
गडहिंग्लज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा केवळ कर्नाटक राज्याच्याच मालकीचा आहे का? असा सवाल येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व ...
गडहिंग्लज :
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा केवळ कर्नाटक राज्याच्याच मालकीचा आहे का? असा सवाल येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार संजय मंडलिक यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
काळभैरी-निपाणीमार्गे बसफेऱ्यांना बेळगाव जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असून, कोगनोळी व शिनोळी येथे 'आरटीपीसीआर' रिपोर्टची मागणी केली जात आहे. त्यामुळे सीमाभागातील प्रवाशांना नाहक त्रास होत आहे, तो दूर करावा.
कर्नाटक सरकारने निपाणी व संकेश्वर गावात जाणाऱ्या महाराष्ट्रीयन प्रवाशांना 'आरटीपीसीआर'ची सक्ती करावी आणि राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी तातडीने खुला करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर, किरण कदम, उदय जोशी, सुरेश कोळकी, शर्मिली मालंडकर, गुंड्या पाटील, रश्मीराज देसाई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.