पुणे जिल्ह्यात चोरी करणाऱ्यास कोल्हापुरात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:54 AM2021-09-02T04:54:22+5:302021-09-02T04:54:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करून बेपत्ता असलेल्या चोरट्यास कोल्हापुरात शाहू ...

Pune district burglar arrested in Kolhapur | पुणे जिल्ह्यात चोरी करणाऱ्यास कोल्हापुरात अटक

पुणे जिल्ह्यात चोरी करणाऱ्यास कोल्हापुरात अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करून बेपत्ता असलेल्या चोरट्यास कोल्हापुरात शाहू मिल परिसरात अटक केली. गणेश नारायण आदमिले (वय ३४, रा. मेथे डिअर चर्चमागे, तळेगाव, दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून मोपेड, दोन एलईडी, दोन मोबाईल संच असा सुमारे ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथके कोल्हापूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी राजारामपुरीतील शाहू मिल परिसरात एका मोपेडस्वारास संशयास्पदरीत्या ताब्यात घेतले, त्याच्याकडे चौकशी करता त्याने आपल नाव गणेश नारायण आदमिले असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या ताब्यातील मोपेड, दोन एलईडी संच, दोन मोबाईल संच असा सुमारे ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हा मु्द्देमाल त्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करून तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक केलेल्या गणेश आदमिले याच्यावर कोल्हापूरसह सोलापूर, पुणे, मुंबई या जिल्ह्यांत चोरीचे सुमारे १५ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. गणेश आदमिले याने सांगली शहर येथूनही बुलेट चोरल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले.

Web Title: Pune district burglar arrested in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.