अलबादेवीतील जळीतग्रस्त कुटुंबाला पुणे-मुंबई ग्रामस्थांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:24 AM2021-03-23T04:24:39+5:302021-03-23T04:24:39+5:30

पुणे व मुंबई ग्रामस्थ मंडळी अलबादेवी यांनी दहा हजार रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्याची मदत केली. त्याचबरोबर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ...

Pune-Mumbai villagers help the burnt family in Albadevi | अलबादेवीतील जळीतग्रस्त कुटुंबाला पुणे-मुंबई ग्रामस्थांची मदत

अलबादेवीतील जळीतग्रस्त कुटुंबाला पुणे-मुंबई ग्रामस्थांची मदत

Next

पुणे व मुंबई ग्रामस्थ मंडळी अलबादेवी यांनी दहा हजार रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्याची मदत केली. त्याचबरोबर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ा आप्पा पाटील, ग्रामपंचायत अलबादेवी, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, गोपाळराव पाटील, माजी सभापती बबनराव देसाई, काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, अशोक कोळी (मंडळ अधिकारी), श्रीकांत नेवगे, नामदेव पाडले, प्रकाश कोले, विद्यामंदिर अलबादेवी शाळेचे शिक्षक, मयूर देसाई (उत्साळी) यांच्यासह अनेकांनी आर्थिक स्वरूपाची तर काहींनी वस्तू देऊन आर्थिक हातभार लावला आहे.

चंदगड रवळनाथ बँकेचे व्यवस्थापक शांताराम भिंगुर्डे यांनीही घरकुल बांधताना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

------

फोटो ओळी : अलबादेवी (ता. चंदगड) येथील जळीतग्रस्त मनोहर शिवणगेकर यांना पुणे व मुंबई ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून संसारोपयोगी साहित्य देताना मंडळाचे पदाधिकारी.

क्रमांक : २२०३२०२१-गड-०२

Web Title: Pune-Mumbai villagers help the burnt family in Albadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.