वडगावात नियम न पाळणाऱ्या १२ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:35+5:302021-04-20T04:26:35+5:30

अत्यावश्यक सेवेतील दुकानांची तपासणी करण्याच्या सूचना प्रांत डाॅ. विकास खरात, मुख्याधिकारी टीना गवळी यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते. ...

Punitive action against 12 traders for not following rules in Wadgaon | वडगावात नियम न पाळणाऱ्या १२ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

वडगावात नियम न पाळणाऱ्या १२ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

Next

अत्यावश्यक सेवेतील दुकानांची तपासणी करण्याच्या सूचना प्रांत डाॅ. विकास खरात, मुख्याधिकारी टीना गवळी यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते.

प्रांत खरात यांनी स्वतः कारवाई केली होती.

या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवेतील नो मास्क नो एन्ट्रीचे फलक दर्शनी भागात न लावणाऱ्या तसेच व्यावसायिकांचे कोरोना निगेटिव्ह किंवा लसीकरण नसणाऱ्या १२ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये स्वप्निल पोवार, भक्ते मिरची केंद्र, केक अँड जॉय, हिरवे स्वीट मार्ट, बुढ्ढे अँड सन्स, दिघे अँड सन्स, कोकण शॉपी, होनोले किराणा दुकान, साई केक, पोपट लोले, गणेश ट्रेडर्स, मोरे अँड सन्स आदींचा समावेश आहे.

दरम्यान, आजपर्यंत ७० रुग्ण झाले आहेत. यातील ३१ रुग्ण बरे झालेले आहेत. तर ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या शहराची काळजी वाढवणारी आहे.

Web Title: Punitive action against 12 traders for not following rules in Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.