कोडोली येथे दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:44+5:302021-05-06T04:25:44+5:30
या पथकात कोडोलीचे सरपंच मनिषा पाटील, तलाठी अनिल पोवार,अमोल कोटे,आरोग्य सेवक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व महसूल कर्मचारी ...
या पथकात कोडोलीचे सरपंच मनिषा पाटील, तलाठी अनिल पोवार,अमोल कोटे,आरोग्य सेवक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व महसूल कर्मचारी यांनी सहभाग घेऊन कारवाई केली.
कोडोली गावात कोरोनाचा संसर्ग वाढत असून दीडशेहून अधिक रुग्ण बाधित झाले आहेत. तर काही जणांचा मृत्यू झाल्याने भीतीच्या वातावरणात असतानाही नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. त्याचप्रमाणे व्यापारीही शासनाचे नियम धाब्यावर बसवत आहेत. यामध्ये मास्क न वापरणे , सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, दुकाने उघडण्यास परवानगी नसतानाही चोरून माल विकणे अशा विविध कारणास्तव अचानक तहसीलदार यांच्या पथकाने छाप मारून दुकाने सीलबंद करण्याची कारवाई केली.
फोटो ओळ : कोडोली येथील मास्क, सोशल डिस्टन्स या नियमाचे पालन न केलेल्या दुकाने सील करताना तहसीलदार रमेश शेडगे, अनिल पोवार व इतर