शांतिसागरजी महाराज यांची पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:29 AM2021-09-04T04:29:24+5:302021-09-04T04:29:24+5:30
हा पुण्यतिथी महोत्सव प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांच्या परंपरेतील पंचम पट्टाधिश प पू. १०८ आचार्य श्री वर्धमानसागरजी ...
हा पुण्यतिथी महोत्सव प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांच्या परंपरेतील पंचम पट्टाधिश प पू. १०८ आचार्य श्री वर्धमानसागरजी महाराज, संघस्थ त्यागीगण व प. पू. स्वतिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी,संस्थान मठ, नांदणी यांचे पावन सान्निध्यात होणार आहे. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न रावसाहेब पाटील असणार आहेत.
पुण्यतिथी समारंभ विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न केला जाणार आहे. त्यामध्ये शांतिसागर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, णमोकर महामंत्र जाप्य, विश्वशांती प्रार्थना, महाराजांच्या अंतिम उपदेशाचे वाचन, पंचामृत अभिषेक पूजा होणार आहे. २० व्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधी सम्राट प. पू. १०८ श्री शांतिसागरजी महाराज यांचे पावन पवित्र स्मृती चिरंतन राहावे, त्यांना अभिप्रेत अशा चरित्र, चारित्र्य, संस्कार, अहिंसा, त्याग यासारख्या सद्विचाराचे समाजमनात अभिसरण व्हावे, त्यांच्या आदेश- उपदेशाचा प्रचार-रसार व्हावा, त्यांच्या विचार आचारांची, कार्य कर्तृत्वाची महती सर्व समाजापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन वीर सेवा दलाच्यावतीने गेल्या ३९ वर्षांपासून निरंतर होत आहे. चालूवर्षीची पुण्यतिथी कोरोना आपत्तीमुळे कुप्पानवाडी, कोथळी येथून ऑनलाईन संपन्न होणार आहे.