तेरवाडमध्ये स्वखर्चातून उभारले शुद्ध पेयजल

By admin | Published: July 26, 2016 11:59 PM2016-07-26T23:59:52+5:302016-07-27T00:37:47+5:30

लोकार्पण आज : शाबगोंडा पाटील यांचा सामाजिक उपक्रम

The pure drinking water raised by the Self in the Torwad | तेरवाडमध्ये स्वखर्चातून उभारले शुद्ध पेयजल

तेरवाडमध्ये स्वखर्चातून उभारले शुद्ध पेयजल

Next

कुरुंदवाड : तेरवाड (ता. शिरोळ) येथील उपसरपंच शाबगोंडा पाटील यांनी गावासाठी वडील माजी सरपंच बाबगोंडा पाटील यांच्या नावे ‘ना नफा-ना तोटा’ धर्तीवर सात लाख रुपये स्वत: खर्च करून शुद्ध पेयजल योजना उभारली आहे. उद्या, बुधवारी या प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. या योजनेमुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे.
पंचगंगा नदीकाठावरच असलेल्या या गावाला पंचगंगा नदीतून ग्रामपंचायतीद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य वारंवार बिघडत असल्याने दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने कृष्णा नदीतून स्वतंत्र नळ योजना करून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पंचगंगेचे दूषित पाणी नृसिंहवाडी येथे कृष्णेत मिळत असल्याने गावच्या योजनेला पुन्हा दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ अद्यापही वंचित आहेत. शाबगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा आघाडीची ग्रामपंचायतीची सत्ता आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाण्यासाठी त्यांनी शुद्ध पेयजल उभारण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: The pure drinking water raised by the Self in the Torwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.