जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने श्रमदानातून केला जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:46 AM2021-03-04T04:46:02+5:302021-03-04T04:46:02+5:30

असळजपासून तीन ते चार किमी अंतरावर असणाऱ्या जंगलातील नष्ट झालेला जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने जंगलातील प्राण्यांना श्रमदानातून ...

The purple water supply was brought to life by the Aslaj Forest Department through hard work | जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने श्रमदानातून केला जिवंत

जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने श्रमदानातून केला जिवंत

googlenewsNext

असळजपासून तीन ते चार किमी अंतरावर असणाऱ्या जंगलातील नष्ट झालेला जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने जंगलातील प्राण्यांना श्रमदानातून पुन्हा जिवंत केला आहे.

असळजपासून तीन - चार किमी अंतरावर घनदाट मोठ्या जंगलातील जांभळीचा पाणवठा गेली कित्येक वर्षे बंद होता. परिणामी जंगलातील प्राण्यांना बारा महिने पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पाण्याचा उगम असूनही पाणवठा मृतावस्थेत होता. जंगलातील प्राण्यांना आगामी उन्हाळ्यात याची झळ पोहचू नये म्हणून वनरक्षक आर. एम. मुल्ला, वन कर्मचारी आनंदा पाटील, पांडुरंग पाटील, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील, सर्जेराव पाटील यांनी त्या घनदाट जंगलात खोरे, टिकाव व अन्य साहित्य वापरून जांभळीचा पाणवठा पुन्हा जिवंत केला.

फोटो- असळज –जंगलातील मृत पाणवठा पुन्हा स्वच्छ व जिवंत करताना वनरक्षक आर. एम. मुल्ला व कर्मचारी.

Web Title: The purple water supply was brought to life by the Aslaj Forest Department through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.