राजे संघर्षातील धुमाळ यांच्या सत्कारासाठी पुरुषोत्तम सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:45 PM2017-10-13T23:45:16+5:302017-10-13T23:47:48+5:30
सातारा : सुरुचि बंगल्यावर उद्भवलेला प्रसंग अत्यंत काळजीपूर्वक हाताळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सुरुचि बंगल्यावर उद्भवलेला प्रसंग अत्यंत काळजीपूर्वक हाताळला. जखमी असूनही जीवाची पर्वा केली नाही. असे जिगरबाज पोलिस अधिकारी किशोर धुमाळ यांचा पुरुषोत्तम जाधव यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी भावनावश झालेल्या धुमाळ यांनी घडलेला प्रसंग उपस्थितांसमोर कथन केला.
सातारा शहर व आनेवाडी टोलनाका शासकीय विश्रामगृह याठिकाणी खासदार, आमदार समर्थक एकमेकांसमोर ठाकले. त्यामुळे संपूर्ण वातावरण संघर्षमय झाले होते. अशावेळी पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे जमावाला काबू करणे अशक्य झाले होते.तरीही पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी जीवाची बाजी लावून लोकप्रतिनिधी व जनतेचे संरक्षण केले. पोलिस यंत्रणा सक्षम असल्याचे दाखवून दिले. यावेळी पुरुषोत्तम जाधव म्हणाले, ‘मी एक माजी पोलिस अधिकारी असल्यामुळे मला धुमाळ यांचा अभिमान आहे. त्यामुळे जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याची मला संधी मिळाली.’ सुरुचि बंगला याठिकाणी कोणत्याही क्षणी गंभीर गुन्हा घडून महाराष्ट्रभर त्याची झळ पोहोचली असती. याची जाणीव ठेवून पोलिस निरक्षिक धुमाळ यांनी दाखविलेले प्रसंगावधान हे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल म्हणून हा सत्कार करण्यात आला आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते जय खुडे, हर्षल जाधव, मंगेश गुरव, देवराज खंडाईत व सागर भोगावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उदयनराजे यांच्या विरोधात खासदारकीला अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधव उभे राहिले होते.