संस्थाचालकाची मुख्याध्यापकास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:36+5:302020-12-30T04:33:36+5:30
वृद्ध दाम्पत्याला भामट्याचा गंडा कोल्हापूर : शासकीय योजनेतून लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील वृद्ध दाम्पत्याचे सुमारे तीन ...
वृद्ध दाम्पत्याला भामट्याचा गंडा
कोल्हापूर : शासकीय योजनेतून लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील वृद्ध दाम्पत्याचे सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन भामट्याने फसवणूक केल्याची घटना कोल्हापुरात घडली. याबाबत गोदाबाई कांबळे (वय ७०, रा. शिपूर, ता. चिक्कोडी, कर्नाटक) यांनी अज्ञात भामट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गोदाबाई आणि त्यांचे पती अण्णाप्पा कांबळे हे वृद्ध दाम्पत्य सोमवारी निपाणी येथे उपचारासाठी गेले होते. दुपारी गावी जाण्यासाठी ते निपाणी बसस्थानकावर आले होते. त्यावेळी एका भामट्याने त्यांना गाठले. त्यांना शासकीय योजनेतून एक लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना कोल्हापुरात आणून रुईकर कॉलनी उद्यानात थांबविले. कार्यालयातील साहेब सोन्याचे दागिने पाहून तुम्हाला पेन्शन देणार नाहीत, असे सांगून भामट्याने त्यांचे गंठण आणि कर्णफुले काढून घेत साहेबांना भेटून येतो, असे सांगून पोबारा केला.