एकमेकांतील द्वेष बाजूला ठेवा

By admin | Published: April 22, 2016 12:39 AM2016-04-22T00:39:46+5:302016-04-22T00:55:45+5:30

पतंगराव कदम, प्रदेशाध्यक्षपदापेक्षा जिल्ह्याशी जवळचा संबंध; संजय पाटील यांचा प्रवेश

Put aside the hatred of each other | एकमेकांतील द्वेष बाजूला ठेवा

एकमेकांतील द्वेष बाजूला ठेवा

Next

कोल्हापूर : जिल्ह्णात अनेक वर्षांपासून काँग्रेस बळकट आहे. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत एकमेकांबद्दलचे द्वेष, जळमट बाजूला ठेवून एकसंघ राहा, असे आवाहन माजी वनमंत्री आमदार पतंगराव कदम यांनी गुरुवारी केले.
येथील पक्ष कार्यालयात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा अध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपमधून संजय पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
आमदार कदम म्हणाले, जिल्हाध्यक्षांबद्दल वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या मी वाचल्या आहेत. अध्यक्षपदाची फारशी चर्चा करू नका. त्यासंबंधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची काय भूमिका आहे, याला मी कवडीचीही किंमत देत नाही. माझा कोल्हापूर जिल्ह्णाशी जवळचा संबंध आहे. पी. एन. पाटील, सतेज पाटील यांनी हाक मारली की मी हजर राहतो. सत्ता नसल्यानंतर काय होते, हे आपल्यालाही कळाले आहे. त्यामुळे जिल्ह्णातील कार्यकर्त्यांनी आपआपसांतील गट-तट बाजूला ठेवून जोमाने पक्ष बळकटीकरणासाठी काम करूया. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणूया. त्यानंतर पक्षातील कोणाचे काय करायचे ते ठरवूया.
आमदार पाटील म्हणाले, सध्याच्या शासनाविरोधात प्रचंड असंतोष आहे. शासन फसव्या योजनांचे गाजर दाखवत आहे. भ्रष्टाचारी कारभार वाढला आहे. त्यामुळे संजय यांना आता काँग्रेस पक्षात राहून शासनाच्या विरोधात काम करण्याची चांगली संधी आहे. संजय पाटील यांचे भाषण झाले.


पन्नास आंदोलन कर...
प्रवेश झाल्यानंतर कदम बोलण्यासाठी उठले. त्यावेळी संजय पाटील हे मला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मला कोणते तरी पद जाहीर करा, असे कदम यांना सांगितले. त्यावर कदम यांनी पन्नास आंदोलन कर मग पद देऊया, असा उपरोधिक टोला लगावता एकच हशा पिकला.

संजय पाटलांना कानपिचक्या..
‘ऊठसूठ आंदोलन करणारा संजय पाटील कोण,’ अशी मला विचारणा होईल. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आदेश आल्यानंतर आंदोलने करावीत. पक्षाच्या ध्येय-धोरणांनुसारच संजयने काम करावे, अशा कानपिचक्या ‘पी. एन.’ यांनी दिल्या. आमचे सरकार असताना नेहमी आंदोलने करणारा संजय पक्षात असता तर आमची अडचण झाली असती, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Put aside the hatred of each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.